Monday, December 6, 2010

तुला आपलेसे करावे किती ?... : मयुरेश साने

तुला आपलेसे करावे किती ?
जगावे किती ? मी ! मरावे किती ?
किनाराच मी ! भरती ओहटिचा
बुडावे किती ? मी ! तरावे किती ?
तू जवळून जाता ! मनी बाग फुलते
तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ?
तुझी याद येते ! तसा तोल जातो
सावरून मी ! वावरावे किती ? ते
"कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले
लिलावात माझ्या ! हरावे किती ?
चांदणे सारखे आज जाळू पहाते
तुझे आज नसणे स्मरावे किती ?
मिठी दे युगांची ! धुके दूर
सारु फुलांनीच दव पांघरावे
किती ? तुला "मी "- मला "तू" - मला
"तू" - तूला "मी" परक्या परी -हे
झुरावे किती ? मयुरेश
साने...दि.०५-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2456

No comments:

Post a Comment