Thursday, December 23, 2010

ती म्हणाली काल जेव्हा......!!! : supriya.jadhav7

ती म्हणाली काल जेव्हा......!!! ती
म्हणाली काल जेव्हा....श्वास
माझा थांबला ना ! मी म्हणालो...
सोड बाता, थांबला तो संपला ना !!
ती म्हणाली काल जेव्हा....मी
तुझी रे, सांग हो ना ? मी
म्हणालो... थांब थोडे, जीव माझा
टांगला ना !! ती म्हणाली काल
जेव्हा....चंद्र-तारे माळतो ना ?
मी म्हणालो... ना खुळे ना, हट्ट
वेडा चांगला ना !! ती म्हणाली
काल जेव्हा.....प्रेम-रागा आळवू
ना, मी म्हणालो....घाबरोनी...मेघ
तो ही पांगला ना !! ती म्हणाली
काल जेव्हा.....सातजन्मी मी तुझी
ना ? मी म्हणालो...काय बोलू ? बेत
थोडा लांबला ना !! ती म्हणाली
काल जेव्हा....घेउ गाडी-बंगला
ना, मी म्हणालो...जा मुली
जा...एकटा मी चांगला ना !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment