इथे पुण्य पापातुनी जन्मलेले
निरप्राध सांगा ठरावे कसे ?
वडवानळाचाच भाऊ किनारा तारु
किनारी तरावे कसे ? बरळून
त्यांनी चुका रोज केल्या मुका
रोज तरी मी चुकावे कसे ? इथे पूर
डोळ्यातुनी सांडताना
कंठातुनी गीत गावे कसे ? इथे
चंदनाने दिली गंधवार्ता
संपून ही मी ऊरावे कसे !
नमस्कार करता मला बोध होतो
दुभंगुनही मी जुळावे कसे ! इथे
एक वेडाच सांगून गेला शोध
घेण्या स्वत: चा हरावे कसे !
जिथे पिंजरा - खास आभाळ आहे
तिथे स्वैर भावे उडावे कसे ?
न्याय होईल केव्हा ? आरोपी
पळाला पुरावे आता सापडावे कसे
? मयुरेशला एकदा सांग बाप्पा !
आजन्म मरण्या जगावे कसे?
मयुरेश साने... दि.२३-डिसेंबर-१०
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, December 23, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment