घोषणा झाली मला फेटाळलेली...
'हुश्श' झाली आसवें कंटाळलेली
माणसे झाली पहा आता शहाणी फार
पूर्वी भोवती घोटाळलेली
पालवी कोठे नसू द्या फार मोठी
आणि ती नक्की नको नाठाळलेली
एकही अश्रू दिसेना आज कोठे
गोष्ट होती आजही रक्ताळलेली
नेहमी असते खर्याची गोष्ट
मागे जातसे जत्रा पुढे
वाचाळलेली मद्य कसले घेत बसता
धुंद होण्या....? जीवने बनवा नशा
फेसाळलेली..! खोल आहे मी
समुद्रासारखा; पण... आजही देतो
उन्हें गंधाळलेली फायदा नसतो
उधारी फेडण्याचा माणसे
गेल्यावरी सांभाळलेली आजही
गावाकडे लज्जा दिसावी...
जीवनाची लक्तरे गुंडाळलेली..!
टेकला माथा जिथे, तेथेच फुटला...
जीवनें इतकी कशी खडकाळलेली..?
एकदा ना एकदा होतील विजयी...
आजही दु:खे उरी कवटाळलेली
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Friday, November 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment