मोडून यार गेला संसार आज माझा
माझ्या मिठीत रडला घरदार आज
माझा.. स्वप्ने तिचीच सारी
दिनरात रंगवीली तो कुंचलाच
झाला बेजार आज माझा.. ना थांब मी
म्हणालो अन् थांबली न ती ही
नाहीच शब्द झाला लाचार आज
माझा.. या ओंजळीत माझ्या फेकून
चार काटे केला असा फुलाने
सत्कार आज माझा.. घरटे लुटून
माझे पाऊस दूर गेला आला असा
फळाला मल्हार आज माझा.. माझ्या
मना तुझी रे झाली उगाच शकले का
झेललास वेड्या तू वार आज माझा..
नि:शब्द आसवांनी भेटून लोक
गेले दिसतो दुनावलेला आजार आज
माझा.. माझीच हाक माझ्या ओठात
बंद झाली विरला मुक्या
मुक्याने झंकार आज माझा.. का रे
व्यथेस माझ्या हसतोस 'शाम' तू
ही तू एकलाच आहे आधार आज माझा..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2446
Wednesday, November 24, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment