Tuesday, November 2, 2010

मी एकटीच येथे!!!(गझल). : supriya.jadhav7

मी एकटीच येथे!!!(गझल). . * श्वासात
ना कुणाच्या ना स्पंदनात आहे,
मी एकटीच येथे माझ्या जगात
आहे! * गोंजारले कितीदा
माझ्याच मी चुकांना, तो शाप
पूर्वजांचा सलतो मनात आहे! * ना
कोसळे कधीचा हा मेघ दाटलेला,
अश्रूच गोठलेला का या नभात आहे
? * ना दामिनी नभीची ना
शुक्रतारकाही, आश्रीत
दीनवाणी माझ्या घरात आहे! *
ऊद्रेक आठवांचा गाडून श्रांत
झाले, दूरस्थ संकटांची येते
वरात आहे! * -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2422

No comments:

Post a Comment