Sunday, November 14, 2010

' कहाणी...'( गझल ) : mamata.riyaj@gmail.com

जो तो पळून जातो ऐकून ही कहाणी
बाजार हा खुळ्यांचा माझी
व्यथा शहाणी हे वेड पावसाचे
डोळे भरून गेले का अंतरात
माझ्या ओलावली तराणी ओझे
तुझ्या कथेचे दारास टांगलेले
ना भार काळजाला का मीच दीनवाणी
हा आरसा जिवाचा केव्हाच
भंगलेला का चेहरा तुझा तो येतो
खुलून राणी जिंकून हारण्या तो
मी डाव मांडलेला माझ्या
पराभवाची गातो खुशाल गाणी
ममता..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2433

No comments:

Post a Comment