Thursday, November 18, 2010

अर्थ आहे : क्रान्ति

आज हा जाई, उद्याला अर्थ आहे का
जुने आता? नव्याला अर्थ आहे
जायचे आहे पुढे, जाणार आहे,
व्यर्थ मागे थांबण्याला अर्थ
आहे? भेकडांचे टोमणे झाले
निकामी, काय त्यांच्या
बोलण्याला अर्थ आहे? दाट
काळोखास मी का घाबरावे? दीप
नाही? काजव्याला अर्थ आहे! का
उगा चिंता, उद्या येईल कैसा? जे
जसे होईल, त्याला अर्थ आहे! सूर
ल्याले सूर्यबिंबाची झळाळी,
सांजवेळी मारव्याला अर्थ आहे
माळ ना या मोकळ्या केसांत
थोडे, त्याविना का चांदण्याला
अर्थ आहे?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2440

No comments:

Post a Comment