मनामध्ये कुठे कुठे तुझे ठसे
अजूनही फुलांत राहिले सुगंध
खूपसे अजूनही दिशा दिशा जरी
तमास शरण जाऊ लागल्या लपून
राहिलेत आत कवडसे अजूनही दिशा
ढगाळताच मी तुझीच वाट पाहतो
नभात दाटतात रोज भरवसे अजूनही
तुम्ही किती मुजोर राख पसरलीत
गावभर निमूट थंड झोपलेत कोळसे
अजूनही! उगाच चेहरा पुन्हा
पुन्हा पुसून पाहतो तसेच
काळवंडतात आरसे अजूनही -
नचिकेत जोशी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2437
Tuesday, November 16, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment