का असे माझ्याकडे हटकून येते?
दु:ख सुद्धा माणसे पाहून येते
मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते
रोज अश्रूंचा सडा परसात
माझ्या रात्र विरहाच्या
कळ्या घेऊन येते सज्ज ठेवूया
चला पंचारतींना वेदना सांगा
कधी सांगून येते? बोलणे माझे
कसे कोणा रुचावे? बोलतो मी तेच
जे आतून येते शोधतो मी चांदणे
केवळ तिच्यातच ती जरी कायम
उन्हे नेसून येते चंद्र
तार्यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते
ह्याचसाठी काढतो खपल्या
जुन्या मी रोज ती फुंकर नवी
होऊन येते चाल करुनी... तो पहा...
आलाच मृत्यू रोज का संधी अशी
चालून येते?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2426
Tuesday, November 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment