ना दिवाळी पाहिली या लक्तराने
!!! . * ज्ञान का वाढे कुणाचे
दप्तराने, ना फ़ुलासी गंध येणे
अत्तराने! * थांबवा थोतांड
भोंदू-दांभिकांचे, का खरे
मरतात कोणी पंचकाने? *
कुंभकर्णी वंश माझा हीच
ख्याती, का उडावी झोप एका
'दस्तकाने' ? * माजलेली
घूसखोरी आत्मघाती, घेतली का
दाद काही लष्कराने ? * पावणे ना
देव कोणाही बळी दे, गांव वेडा
शेंदरी या 'पत्थराने' ! * भव्य
होती रोषणाई त्या महाली, ना
दिवाळी पाहिली या लक्तराने ! *
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2423
Tuesday, November 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment