आषाढघनांचे गाणे वेचावे
म्हटले होते रंध्रांत
सुरांचे गाणे पेरावे म्हटले
होते जो माझ्या वाटेवरती
पेरून चांदणे गेला, त्या लोभस
आनंदाला भेटावे म्हटले होते
एकाकी अभिमन्यू मी, लढले पण
अंती हरले नियतीच्या
चक्रव्युहाला भेदावे म्हटले
होते हातात उरे इतकासा चतकोर
फाटका तुकडा, आभाळ तुझे सवडीने
झेलावे म्हटले होते मी ऐन
क्षणी चुकले अन् सोंगट्या
पटावर थिजल्या हा डाव
जिंकण्यासाठी खेळावे म्हटले
होते
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2434
Sunday, November 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment