Thursday, November 25, 2010

तू ..... : supriya.jadhav7

तू ..... . * कधी, कशी, कुठे सखे, नभा
मिळे धरा इथे? न सावलीस लाभणार
चेहरा खरा इथे ! * पहाट पारिजात
हा जरी लुभावि अंगणा , तुझाच
गंध माळुनी सलज्ज मोगरा इथे ! *
उठायचे निजायचे सुरू
रहाटगाडगे, अजून 'याद' कोवळी
सतावते जरा इथे ! * तुझी 'अदा'
तुझी नशा तना-मनास पेटवी,
'खडा' दुधात टाकणार भास बोचरा
इथे ! * पुन्हा मला कुशीत घेत
शब्द पेंगले जरी , तुझ्याच
आठवात दंग कैफ़ नाचरा इथे ! *
प्रहार लक्ष झेलण्यास
काळरात्र झुंझली, तरी नवाच
भासतो अरुण हासरा इथे ! *
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment