Monday, November 15, 2010

अबोली !!! : supriya.jadhav7

अबोली !!! . * अजस्त्र ज्वाला
लपापणा-या कणात माझ्या!
सहस्त्र लाटा उधाणती का मनात
माझ्या? * मनाप्रमाणे निकाल
लावू भल्याभल्यांचा, मनुष्य
कोठे.....? कुबेर मिंधा धनात
माझ्या! * जगोत किंवा मरोत कोणी
तमा कुणाला? लखाखणारा सुराच
आता ऋणात माझ्या! * घरी नि दारी
सदैव नांदी नराधमांची, मिळे
उपेक्षा पदोपदी 'या' जनात
माझ्या! * सुगंध देणे,मिटून
जाणे क्षणाक्षणाने,
मुक्या-मुक्याने भिने अबोली
तनात माझ्या! * -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment