देणे तुझेच सारे देवू तुला कसे
रे तू देव राउळीचा जो अंतरी
वसे रे !! टाळून संथवाटा गंधीत
पावलांच्या मी जोडले जगाशी
नाते कसे बसे रे!! बेधुंद हे
किनारे लाटा मिटून गेल्या
जपले उरात सारे वाळूतले ठसे रे
!! उर्मी मनातल्या या दाटून
राहिलेल्या का हुंदका जिवाचा
ओठामधे फसे रे !! आवेग वादळाचा
आला तसाच गेला जे सोसले तयाची
जाणीव ही नसे रे!! ममता...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment