हवे कशाला हसावयाला, नवे बहाणे
अजून काही तयार झाले जगावयाला
नवे दिवाणे अजून काही... हरेल
शत्रू , नव्या दमाने चला लढाई
लढावयाला मिळून गाऊ
पराक्रमाचे नवे तराणे अजून
काही... कुणी रहाते इथे उपाशी,
कुणा मिळे भाकरी तुपाशी नको
उद्याची मनास चिंता, खिशात
दाणे अजून काही... अजून आहे मनात
वेड्या नव्या मनूची नवीन आशा
प्रशांत स्वप्ने नव्या जगाची
पुन्हा पहाणे अजून काही...
मनावरी का अजून असती
मणामणांच्या जुनाट बेड्या?
चला शिकू या सुधारणांचे धडे
शहाणे अजून काही... किती उराशी
जपावयाची पराभवाची जुनाट
दु:खे? गड्या विशाला पुढेच जा
तू..; नवी ठिकाणे अजून काही....
विशाल...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2571
Wednesday, March 2, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment