ठरून येते, चुकून येते, बरेच
काही मनात माझ्या कुठून येते
बरेच काही? भणंग संध्या, भकास
राती, उजाड स्वप्ने नसेल ती तर
जमून येते बरेच काही जमेल
तितकीच ठेवतो मी विनम्र वाणी
बरेचदा मग मधून येते बरेच काही
गुलाम इतका बनून जातो
सजावटीचा चितेवरीही सजून
येते बरेच काही कुणाकुणाला
छदाम नाही, कुणाकुणाला
पिढ्यापिढ्यांचे असून येते
बरेच काही खरेच त्यांना असेल
भीती पराभवाची तहास
त्यांच्याकडून येते बरेच
काही बनून 'कणखर' जगात केवळ
जमेल कैसे? सुखात जगण्या अजून
येते बरेच काही
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2575
Sunday, March 6, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment