शत्रु समोरून थेट वार करुन
गेला - मित्र मिठित पाठीवर वार
करुन गेला ! मैफिलीत हास्यरंग
उधळण्यास आला सुतकी
चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला !
सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला
- तिरडीवर मात्र आज छान हसुन
गेला ! पौर्णिमेस गोल चंद्र
पाहण्या विसरला , अवसेला
काजवाच चकित करुन गेला !
भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट
झाला सचोटिचा देव तिथुन कधिच
पळुन गेला !
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Saturday, March 26, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment