Friday, March 25, 2011

माझा मुलगा..... : supriya.jadhav7

जागोजागी भेटत असतो माझा
मुलगा शूरवीर पुरुषांतही
दिसतो माझा मुलगा टगेगिरी अन
हुल्लडबाजी, पटे तया ना
शंकराहुनी भोळा दिसतो माझा
मुलगा काही केल्या झोप मला ना
येते जेव्हा थोपटतो अन गातही
बसतो माझा मुलगा दु:खाचा मग
डोंगर थोडा हलका होतो
पित्याप्रमाणे अश्रु पुसतो
माझा मुलगा कितीक वेळा थिजून
गेले वादळ-वारे हिमालयागत
तटस्थ असतो माझा मुलगा कधी
अचानक घरात येता कुणी पाहुणे
पाट्यावरली चटणी पिसतो माझा
मुलगा 'व्हिली' मारतो, कविता
करतो, गाणी गातो, झ-याप्रमाणे
स्वच्छ हसतो माझा मुलगा
अभ्यासाचीच तया लागता अविट
गोडी रात्रं-दिन पुस्तकात
घुसतो माझा मुलगा आठवते मज
माझे बाबा असेच होते घोळक्यात
मित्रांच्या असतो माझा मुलगा
माझ्या कविता,माझ्या गझला,
माझ्या रचना दाखवीत सा-यांना
बसतो माझा मुलगा
त्याच्यासाठी एक गुणीशी धाड
'परी' तू (देवा) , चमचमत्या
वस्तू.... ना फ़सतो माझा मुलगा
प्रत्येकाला सुपूत्र ऐसा,
मिळे भाग्य ना, क्षणोक्षणी
अंतरात ठसतो माझा मुलगा
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment