Wednesday, March 9, 2011

आज वळून पाहताना तुला शोधावे लागले : मन_ईशा

आज वळून पाहताना तुला शोधावे
लागले किती काळ लोटला मधे हे
मला मोजावे लागले कोंडलेल्या
भावनांना व्यक्त ना केले कधी
हृदयी जे घुसमटले ते मला
सोसावे लागले गवसला नाही मजला
चेहरा हा माझा कधी कशी होते मी
हे आरशात मला पाहावे लागले
निसटलेल्या नात्यांची वाटली
ना खंत कधी बांधणारे बंध कोणते
? हे मला आठवावे लागले या
सुखानो वाट चुकवूनी माझ्याही
दारी कधी दु:ख लिम्पुनी घर
माझे हे मला सारवावे लागले वाट
पाहते तुझी जीवना, भेटुन जा
एकदा कधी तुझे केवढे ऋण मजवरी,
मला फेडावे लागले आज वळून
पाहताना जीवना तुला शोधावे
लागले किती काळ लोटला मधे हे
मला मोजावे लागले
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment