संकल्प मी मनाशी धरणार आज आहे
माझ्याच सावलीला जपणार आज
आहे... त्याचा गुलाम असणे
नाकारणार आहे चुकवून आरशाला
लपणार आज आहे... गात्रांत उंच
लाटा हिंदोळती सुखाच्या
उधळून मीपणाला जगणार आज आहे ....
विसरून टाकलेले सगळ्याच
अपयशांना स्वप्ने नव्या
दमाने बघणार आज आहे... होते नकार
तेव्हा ओठावरी सखीच्या हिंमत
पुन्हा नव्याने करणार आज आहे...
प्रीती सुरी दुधारी, प्राणास
काळ होते बुद्ध्याच मी सुखाने
कटणार आज आहे... जा सांग
वेदनेला, "जा-जा, नकोच थांबू,
तुजवर 'विशाल' वेडा हसणार आज
आहे" विशाल...
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment