Tuesday, March 15, 2011

स्वाभिमानी नार मी !! : supriya.jadhav7

स्वाभिमानी नार मी !! झेलला
ह्रदयी जरी हा वार मी ! घेतली
नाही तरी माघार मी !! जीवनाची
भीक तू घालू नको... भाबडी दासी
नसे लाचार मी !! अर्पिले
सर्वस्व मी तेव्हा जरी....
त्यागते सौभाग्य हे साभार मी !!
घे तुझा रे मार्ग आहे मोकळा...
साहणे ना रोज स्वैराचार मी !!
संस्कृतीचा थाट 'साहेबी'
नको... भारताची स्वाभिमानी नार
मी !! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment