Tuesday, March 8, 2011

कृष्ण हा बदनाम येथे : Ramesh Thombre

कृष्ण हा बदनाम येथे, राधिकेचा
डाव आहे नंद नाही, ना यशोदा, हा
कुणाचा गाव आहे ? कोण होता काय
झाले, पाहवेना खेळ सारा, काल जो
बेभाव गेला, आज त्याला भाव आहे.
मी भरोसा टाकलेला, तार किंवा
मार आता रंग बदलू जीवनाची,
बेभरोशी धाव आहे. वात आला, पूर
आला, पार केले ओंडक्याने दोन
अश्रूंनी बुडाली, ही कशाची नाव
आहे ? कोण छोटा, कोण मोठा,
व्यर्थ सारे सार झाले
सानुल्याच्या या जीवावर,
लांडग्याचा ताव आहे. रंग गोरा
भाळलो मी, यात आहे काय मोठे ?
'काजळा'चा रंग पोरी, 'काळजा'चा
ठाव आहे. का 'रमेशा' खोडतो तू,
चित्र जे आभास झाले या दिलावर,
त्या 'प्रियेचे', कोरलेले नाव
आहे. - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment