काय झाले जर तुला मुखडे बदलणे
जमले? हो ! मला सुद्धा तुझ्या
साच्यात बसणे जमले पाहुनी
धाग्यास जळताना प्रकाशासाठी
मेणही गेले शिकुन,.... त्याला
वितळणे जमले वावटळ वेडी जराशी
काय ती भेटावी, मस्तकापर्यंत
मातिस आज उडणे जमले
बालपण्,ज्वानी,खुणा
वृद्धापकाळा मधल्या उमर ही
नटली,तिला कपडे बदलणे जमले
मानतो आभार मी वाटेतल्या
काट्यांचे त्यामुळे तर ताठ ''
कैलासा''स झुकणे जमले.
--डॉ.कैलास गायकवाड.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Sunday, March 13, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment