शोधले नाही पुन्हा आधार मी
घेतली नाही कधी माघार मी...
भावना गोंजारुनी रडलो कधी
मांडला नाही तरी बाजार मी...
स्वार्थ आता धर्म झाला मानवी
पाहिले त्यागासही लाचार मी....
सांत्वनांचे शब्द खोटे ऐकले
भोगले कित्येक अत्याचार मी...
चौकटी त्या भेदल्या होत्या
कधी आज फिरुनी पाळतो आचार मी...
का जिवांना घोर जखमांचा असे?
सोसले ते घावही साभार मी...
विशाल
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, March 14, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment