नको मित्रा, नको आता, पुन्हा
केव्हातरी बोलू जिव्हारी
लागल्या जखमा, अती झाल्यावरी
बोलू अताशा शब्दही सारे, थिटे
पडतात सांगाया जरासा अर्थ
शब्दांना, नवा आल्यावरी बोलू
खुल्या रस्त्यावरी इतका,
तमाशा चांगला नाही बघूया काय
आहे ते, घरी गेल्यावरी बोलू
तुझा हा चेहरा सांगे, समाधी
लागली आहे तुझ्या डोळ्यातले
पेले, रिते झाल्यावरी बोलू
खुशाली एकमेकांची , विचारु
एकमेकांना जुने काही नवे काही,
चला काहीतरी बोलू व्यथा ही तिच
ती आहे, कथाही तिच ती आहे इथे
एकून घेणारा, कुणी नाही तरी
बोलू
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2605
Monday, March 28, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment