Friday, April 16, 2010

मारला गेलो : कैलास

*गझल परिचय* *वृत्त : वियद् गंगा (
उर्दू : हजज मुसम्मन सालिम )*
*उर्दू गण मफाइलून मफाइलून
मफाइलून मफाइलून* *मोडणी
लगागागा लगागागा लगागागा
लगागागा* *लगावली U - - - U - - - U - - - U - - -*
*मात्रावली १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ २
१ २ २ २ * *मारला गेलो * जिथे
जिंकायचे होते तिथे मी हारला
गेलो जगायाचे जिथे होते तिथे
मी मारला गेलो जिणे संपायला
आले तरी सजलो कधी नाही कशा
सरणावरी ऐसा अता शृंगारला
गेलो असा कंटाळलो होतो तशा
त्या त्या तराण्यांनी दिल्या
छेडून तारा तू पुन्हा झंकारला
गेलो मवाळा सारखा होतो परी
अन्याय मोडाया न होतो साप मी
कैसा तरी फुत्कारला गेलो
अलभ्यच लाभ मी वदलो घरी आल्या
रिपूलाही पहा माझ्या घरी कैसा
सदा दुत्कारला गेलो तसा गोंडस
जरी नाही तरी त्या
सुस्वभावाने असा '' कैलास '' मी
तान्ह्या परी गोंजारला गेलो.
*डॉ.कैलास गायकवाड.*
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment