Monday, April 19, 2010

उत्तर : अमोल शिरसाट

*पुरे तुझा हा रडवेला स्वर; चल
जगण्याशी दोन हात कर! तुझे नि
माझे जमणे नाही.... जा बाई तू मला
माफ कर...! दुर्गंधी लपणार
कोठवर? जरी लावले उंची अत्तर !
मीही मित्रा ध्यास घेतला....
कितीक करशील माझा वापर?
रानफुले शिकतात उन्हातच...
कुठली शाळा? कुठले दप्तर? आता
असतील प्रश्नही माझे हवे तसे
मी देईन उत्तर...!* /अमोल शिरसाट,
अकोला. ९०४९०११२३४/.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment