Sunday, April 11, 2010

मात्रा : क्रान्ति

मनाची अता थांबली काहिली
विषाला विषाचीच मात्रा दिली!
कुठे लोपले कालचे हासणे? कुठे
ती तुझी आज जिंदादिली? कुणी
जाणल्या का नभाच्या व्यथा?
कुणी मातिची यातना पाहिली?
सुखाचा तिथे घोष होईल का? जिथे
वेदनेचीच संथा दिली! दुभंगून
घे माय पोटी अता, उभा जन्म मी
वंचना साहिली
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment