Friday, April 30, 2010

अय्याशखोर : गंगाधर मुटे

अय्याशखोर
मेंदू उगाळतांना माणूस थोर झाला
पंडीत कायद्याचा बाजारखोर झाला
कंकाल हा नराचा जाणीव लोपलेला
सोडून लाजलज्जा मुद्राचकोर झाला
माणूस धर्म ज्याने खुंटीस टांगलेला
भंगार तो तनाचा अय्याशखोर झाला
का ग्रासले मनाला सदैव
कंकणाने फ़ंदात मोहिनीच्या
साधू छचोर झाला
नसतेच जे मिळाले केंव्हाच सातजन्मी
ते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला
"कैवार गांजल्याचा" तो डावपेच होता
अधिकार प्राप्त होता
अन्यायखोर झाला का पारखा
मनुष्या, मानव्यतेस तू रे
त्यागून कर्मधर्मा, अभये अघोर
झाला गंगाधर मुटे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2059

No comments:

Post a Comment