Monday, April 26, 2010

मी जसा आहे तसा.. : ऋत्विक फाटक

वासनांना अंत नाही पण मनाला
खंत नाही- बेरडे वैराग्य
येण्या कोरडा मी संत नाही.. मी
जसा बाहेरुनी आहे तसा आतूनही
मी.. तोतया पोशाख घेण्याएवढा
श्रीमंत नाही! जे मनाला वाटते,
पटते तसे बोलून टाके, अक्षरे
तोलावया मी थोर प्रज्ञावंत
नाही! मुक्तछंदाचा कवी मी शब्द
शब्दा जोडणारा, उमलती आर्या
रचाया पात्र, मोरोपंत नाही ते
बघा कवितेकडे या नासिका
मुरडून गेले.. का? म्हणे- 'रचनेत
या दिसला कुठेच वसंत नाही!' का
इथे हे गीत मरणाचे तुझे गातोस
वेड्या! मी तुझ्या श्राद्धास
येण्या जातिचा किरवंत नाही!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2057

No comments:

Post a Comment