कोंडलेली तीच ती फिरते हवा घेत
नाही श्वासही कोणी नवा!
पावसाचे थेंबही अॅसीडचे
सावलीचा पेटलेला गारवा! जर
तुझा एकांत आहे सोबती तर
कशासाठी कुणाला बोलवा? त्या
तिथे बागेमध्ये फुलती फुले तू
तिथे नेऊ नको इथली हवा... स्थीर
होण्याचे नदीला सांग ना
अन्यथा वाहून जाइल चांदवा...
वेचली मी एवढी सुंदर फुले
वेचताना मीच झालो ताटवा! तेज
त्याने पाहिल्यावर एवढे- तो
अता सूर्यास म्हणतो काजवा!! -
प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, April 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment