Saturday, April 17, 2010

वेळिअवेळी : क्रान्ति

एक सांगु का? बरे नव्हे हे असे
बहरणे वेळिअवेळी सांजसावल्या
खुणावताना दंवात फिरणे
वेळिअवेळी वेळिअवेळी झुळुक
कोवळी तुझा विचारी ठावठिकाणा,
हिरमुसलेल्या चंद्राचेही
तुलाच स्मरणे वेळिअवेळी रोज
भेटलो तरी न घडते भेट कधीही
मनासारखी, आठवून त्या जुन्याच
भेटी, उगाच झुरणे वेळिअवेळी
वाट वाकडी करून त्याच्या
वाटेवर रोजचे थबकणे,
आसुसलेल्या नजरांचे गालिचे
पसरणे वेळिअवेळी आजकाल हे
असेच होते, वेळिअवेळी गुलाब
फुलतो, भूल पाडते रातराणिचे
गंध विखुरणे वेळिअवेळी ऐक मना
रे, पुन्हा सांगते, वेळ कधी
सांगून न येते, जगता जगता हाती
उरते केवळ मरणे, वेळिअवेळी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment