Tuesday, April 20, 2010

आयुष्य : पुलस्ति

जुनीच गणिते पुन्हा नव्याने
मांडत आहे आयुष्याची गृहीतके
पडताळत आहे जगण्याचा कोणी
शिकवावा अर्थ... कुणाला? मीही
केवळ माझ्यापुरता लावत आहे
आयुष्याचा वेग विलक्षण आहे; पण
मी - अखेर त्याला अर्ध्यावरती
गाठत आहे कोण शक्यता पेरत गेले
उरात माझ्या? 'चल किरणांशी
खेळू'... कोंभ खुणावत आहे! जेथे
होतो तिथेच आहे... वरवर बघता आत
आत एकेक वेस ओलांडत आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment