Friday, April 23, 2010

पाय : किमंतु

असा कसा उठला बाजार श्रद्धेचा
ज्ञानिया रेड्याचा हा हाती
कासरा, धरला विठू तू रुजू
शासकीय महापुजा दुष्काळ
निवारणा विकासाच्या नावे
खिसा, भरला विठू तू भेगाळली
वीट पुंडलिकाची वाहून पापाला
इतुका सुवर्णाच्या भाराने
वाकला विठू तू नाम्याच्या
समाधीचा चोरला जाताना चिरा
तुझ्या इमल्यावर चढवला इमला
विठू तू आषढी-कार्तिकी
श्राद्ध तुकयाचे इंद्रायणी
तीरा सुधारणा बुडाली गाथा
वाचत बसला विठू तू कल्लोळ
पैशाचा बडवे नाचती
दिंड्या-पताका वैष्णव
दीनवाने रांगेत पाहुन हसला
विठू तू पारायणाचा झाला
इव्हेंट आणि वारीची जत्रा
मुखवटा चांदीचा लावून गप
झोपला विठू तू दुमदुमली पुण्य
पंढरी हौश्या नवश्या गवश्या
चोरांच्या आळंदीला साक्षीला
धावला विठू तू? श्रद्धेच्या
वारकर्‍याची ज्यांनी बांधली
उत्तरपुजा त्यांच्याच नवसाला
कायद्याने पावला विठू तू
दुष्काळाने गांजला तरीही
सारी वारी चालला तुझ्या दारी
थांबला तरीही न ढळला विठू तू
वारीमध्ये जो रंगला तु़झ्या
नादात दंगला उभा जन्म त्याचा
भंगला जागला विठू तू या
पामराने असा स्वर्ग मागितला
कोणता की त्या हजार
दरवाज्यांमागे दडला विठू तू
मी हात पुढे केला महारोगी हा
सत्याचा नेमका त्यावेळी का
मागे सरला विठू तू युगे
अठ्ठावीस उभा राहून खरेच
झिजला की पंढरीतून आता पाय
काढला विठू तू? किमंतु आनंदऋतू
प्रकाशन ०३/०९/२००९
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2053

No comments:

Post a Comment