Thursday, April 1, 2010

वाणी : क्रान्ति

*नेहमीपेक्षा जरा वेगळा
प्रयत्न! * बरी मौनात होते मी,
छळाया लागली वाणी कधी याला,
कधी त्याला सलाया लागली वाणी
तुझे ते टोमणे, ते बोचणारे बाण
शब्दांचे, गिळू बघती जरी नजरा,
गिळाया लागली वाणी तुला का
भेटले नाही पिडाया आणखी कोणी?
मला खोट्या निमित्ताने
पिळाया लागली वाणी पुरे ना,
आटले का सांग या डोळ्यांतले
पाणी? उगा का धाय आता मोकलाया
लागली वाणी? जरा व्हावे मुके
आता, पुरे हे बोलणे झाले, कुणी
ऐसे न बोलावे, "चळाया लागली
वाणी!"
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment