हि कधी का वागण्याची रीत आहे
जो तो नुसता आपल्या धुंदीत आहे
मज तुझ्या रागावण्याचा धाक
नाही मी तुझ्या या आसवांना भीत
आहे हा उगाचच शोध नाही चाललेला
थांबलेली तू मला माहित आहे देव
मजला टाळतो आहे कधीचा तो तरी
माझ्या कुठे गणतीत आहे सौख्य
भेटायास आले फुरसतीने मी
म्हणालो, मी जरा घाईत आहे रोज
तुटतो अन पुन्हा बनतो कसा मी
कोण हा मज सारखा घडवीत आहे
....कैलास गांधी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, April 10, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment