तुला पाहतो...जणू पाहतो आरसाच
मी! किती किती भासतो स्वतःला
वेगळाच मी! अजून मजला साद
घालती चुकार लाटा.. अजून आहे
किनार्यावरी कोरडाच मी! बदल
तुझ्या नजरेतच बहुधा आहे झाला
नाहीतर हा तसाच आहे कालचाच मी!
जणू हरवलो सागरामध्ये
गहिरनिळ्या.. फक्त तुझ्या
डोळ्यांत पाहिले एकदाच मी!
चांदणराती क्षणभर येते याद
तुझी, मग.. घाबरतो हे जाणवून की
एकटाच मी! चुंबनओल्या रात्री
संपुन युगे लोटली भिजतो अजुनी
आठवांत त्या का उगाच मी?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2050
Wednesday, April 21, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment