ह्या मनाचे, दुश्मनाचे काय
करावे ? ज़ख्म ओली ठेवते हे, काय
करावे ?..... आज त्याचे पंख त्याला
काम न येई पाखरु हे कैद झाले
काय करावे ?..... रोज का रे जीव
माझा व्याकुळ होतो ? बाण
त्याचे मौज देई काय करावे.....
पारध्याचे नाव का बदनाम असे हे
/ ( असावे ) ? ओढ घेई मृग त्याचे
काय करावे ?..... मी न माझा होउ
शकलो, काय मजा ही ! मी तुझा होऊन
गेलो, काय करावे ?..... ` ख़लिश ' -
विठ्ठल घारपुरे / ५-४-२०१० * शेर
क्रमांक ४ मधे विश्वस्तानी
योग्य पर्याय ठेवावा ही
विनंती.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2025
Monday, April 5, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment