Saturday, January 1, 2011

नवे साल गाणे जुने गात आहे... : मयुरेश साने

जुना मी तरीही नवी बात आहे
जुन्या चंद्रम्याची नवी रात
आहे तुझा चंद्र नाही तुझ्या
बाहुपाशी सदा राबता मी
हापीसात आहे काळोख आहे आता ही
उद्या ही जुन्या कंदीलाची नवी
वात आहे किती काळ दु:खात ऐसे
रडावे नवे हासणे अन् जुनी कात
आहे अशी गोड वचने देउ नको ना
नवे राहू दे ! गं- जुने खात आहे
संकल्प लिहिले जुने - ते
नव्याने बोलाची कढी बोलाचाच
भात आहे अरे ट्रेन नाही रवीवार
आहे कडी पकडण्याला पुढे हात
आहे जगावे कशाला कुणाला कळेना
हप्ता विम्याचा तरी जात आहे
मयुरेशला सांगुनीही कळेना
नवे साल गाणे जुने गात आहे.
मयुरेश साने...०१-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment