Thursday, January 13, 2011

अधनंमधनं आनंदाची कडमड आहे : विजय दि. पाटील

ही जगण्याची तालिम फुटकळ धडपड
आहे पडदा पडला, नाटक बसणे अवघड
आहे देहाचा डोलारा वरती दिसतो
भक्कम आतच आहे ती.....जी काही
पडझड आहे कोणी म्हणती जादू,
कोणी काजळमाया तू करते ते
प्रेमच...बाकी बडबड आहे आई
बाबांना काशीला नेण्यासाठी
श्रावणबाळाची कोठे ही कावड
आहे? मी कोणाचे देणे जर का लागत
नाही दारावरती आली कसली झुंबड
आहे? गुरगुरणार्‍या
प्रत्येकाचे खपवुन घेतो कोडे
पडते, का इतका मी बथ्थड आहे
सत्ता नुसती दु:खांची ना आता
येथे अधनंमधनं आनंदाची कडमड
आहे निव्वळ ताणत गेले, तुकडा
पडला नाही जीवन हे की केवळ
भाकर वातड आहे?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2495

No comments:

Post a Comment