आसवांचे सूर ओल्या पापण्या
गातात आता माझिया डोळ्यात आहे
जागलेली रात आता चांदणे आलेच
नाही अंगणी माझ्या कधीही
अंगणाशी बोलतो मी चांदण्या
शब्दात आता कोणता कंदील लावू
जिंकण्या काळोख येथे ? काजळी
होते दिव्याची पेटणारी वात
आता मोगरा नाही तुझा मी तू मला
माळू नको ना वादळे का मागशी तू
मोकळ्या केसात आता ? सोसतो मी
वार सारे आपुलाले - वेगळाले
वेदनेला भाव आहे कोणत्या
घावात आता ? मयुरेश
साने...दि...१३-जानेवारी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, January 13, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment