Saturday, January 22, 2011

मोग-याचा पसारा.....(गझल) : supriya.jadhav7

मोग-याचा पसारा..... तुला रोज
येतो, कधीही शहारा ! निरखणे
तुझे, रोमरोमी थरारा !! उगाळू
किती संयमी चंदनाला, उरी
स्पंदनांचा धुमसतो निखारा !!
जरी गुंगल्या चांदण्या दूर
तेथे, खुणावी कधीचा मला
शुक्रतारा !! सुगंधी बटांची
नशा मैफ़िलीला, तया चुंबितो
स्वैर- बेधुंद वारा !! नको जागणे
अन नको हे उसासे, तुझे श्वास
गात्री, विरे हाय पारा !! चुरावी
कशाला कुणी रातराणी, सख्या !
धुसफ़ुसीला नसावाच थारा !!
पहाटे पहाटे मिठी सैल होता,
कसा आवरु मोग-याचा पसारा ?
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment