टाळतो किती मी त्यांचा
ससेमिरा पण, सायास फोल आहे तीच
तीच नाती भेटायचीच कारण...
आयुष्य गोल आहे टाकले खडे मी
नाना प्रकारचे पण, उपयोग शून्य
झाला समजले अखेरी... रांजण
तुझ्या मनाचा भलताच खोल आहे
रोजच्या झळांनी गेली सुकून
स्वप्ने, गेलेत खोल डोळे
त्यामुळे खरे तर डोळ्यांमधे
जराशी अद्याप ओल आहे शेवटी
मिळाली... फुटकळ जुनीच दु:खे,
किरकोळ जून जखमा
पुण्यसंचयाचे देवा तुझ्या
दुकानी इतकेच मोल आहे? दर्शनास
डोळे आतूरले कधीचे... पण पालखी
दिसेना वीज अन ढगांचा नुसताच
आसमंती ताशा नि ढोल आहे घेउनी
भरारी... आव्हान अंबराला
देशीलही मना पण ठेव फक्त
ध्यानी... सांभाळला तुझाही
त्यानेच तोल आहे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, January 6, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment