गर्व..... जगावे किती अन जगावे
कशाला ? तुझा हात आता न माझ्या
उशाला !! स्मरावे किती
विस्मरावे किती मी ? तुझे सूर
जे वर्ज झाले घशाला !! (गळ्याला)
किती दे मुलामा, न सांधे तडा हा,
कसे खोडणे संशयाच्या ठशाला ?
कुणी टाचले, फ़ाटलेल्या नभाला ?
जगी दाद-टाळ्या, फ़जीती-हशाला !!
जळा त्यागले, भाळला मृगजळाला,
'गुरु' भेटतो रे जसाची तशाला !!
जगा जिंक तू, हार ठावी मनाला,
फ़ुका गर्वची भोवला ना सशाला !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Thursday, January 20, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment