Tuesday, January 18, 2011

छंद.... : supriya.jadhav7

छंद.... खरा कायद्याने मला फास
होता ! अबोला क्षणाचा, जणू मास
होता !! उशाला नहाली तुझी
सोडचिठ्ठी, तुझ्या कुंतलांचा
जिला वास होता !! पहाटे पहाटे
उन्हे शोध घेती, सुन्या
उंब-याला तुझा भास होता !! जरा
हालली सावली ही कुणाची ? तुझी
मुर्त की, फ़क्त आभास होता !! सखे
ऐक ना हाक या अंतरीची, इथे
गुंतलेला तुझा श्वास होता !!
कळालेच नाही कधी हारलो मी,
तुझा छंद हा ही, तसा खास होता !!
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment