तारा असण्याचा भरला सारा सारा
मी चमकू का थोडासा आता अंधारा
मी? सल्ले देतो... काहीही कामाचा
नाही आलो तेव्हापासुन आहे
म्हातारा मी अंशानेही
वापरलेले नाही त्याला खेचत
बसतो हा मेंदूचा पेटारा मी
'हेतू आहे जगण्याचा' हे सांगत
फिरणे आवारा हा, आवारा तो,
आवारा मी माझ्या कर्तृत्वावर
नसतो टिकलो येथे लोकांच्या
चांगूलपणावर जगणारा मी
केव्हा केव्हा वाहू देतो
अस्तित्वाला केव्हा बनतो
स्वतः स्वतःचा बंधारा मी
ज्यांचा नाही त्यांचा
होण्यासाठी जातो ज्यांचा आहे
त्यांचा करतो तिटकारा मी
पाचोळा होतानाही का झुंजत आहे?
उडता उडता धाडत माघारी वारा मी
माझ्या संदर्भात राहिलो
'बेफिकीर'... पण... केले कवितेला
शब्दांचा देव्हारा मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Tuesday, January 18, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment