Friday, January 21, 2011

असा मी "असामी" कुठेही कसाही : मयुरेश साने

असा मी ! कसा मी ? कुठेही कसाही
असा मी "असामी" कुठेही कसाही
मला पाहताना किती लाजशी तू
तुझा आरसा मी कुठेही कसाही
तुझ्या कंकणी नाद मझाच येतो
तुझा भरवसा मी कुठेही कसाही
मुका शब्द होतो तु येता समोरी
तसा बोलका मी कुठेही कसाही जरा
स्पर्शु दे ना ! तुझे चांदणे हे
तुझा कवडसा मी कुठेही कसाही
फुला सारखी तू सदा गंध वेडी
सुना उंबरा मी कुठेही कसाही
सखे सोबतीला मला साथ देतो तुझा
भास नेहेमी कुठेही कसाही
मयुरेश
साने...दि...२१-जानेवरी-११
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment