पाहिले तुला हळूच काल मी तिथे
वळून रूपमोगरा मनात दरवळे
तुझा अजून . ओतले मधाळ गोड रूप
साजिरे तुझ्यात चंद्र पाहता
वरून लाजतो तुला बघून . आजकाल
आसपास होतसे तुझाच भास प्राण
प्राण रोम रोम गातसे तुझीच धून
. बघ वळून तू जरा तुझा पतंग
लाजरा गं लाव हास्यज्योत तू गं
प्राण चालला विझून . हाय काय
हासलीस हाय काय लाजलीस हाय का
गं चाललीस जीवनास मंतरून .
तुषार जोशी, नागपूर .
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Friday, January 21, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment