या श्वासाचा,कुणी भरोसा
द्यावा , तू ये ना तुझ्याचसंगे
क्षण शेवटचा जावा, तू ये ना
माझ्या समोर दिसते आहे गर्दी
,पत्रांची... पण आला नाही तुझाच
सांगावा, तू ये ना आठवते का
जिथे चाललो होतो ,त्या दिवशी
त्या वाटेवर जरा विसावा
घ्यावा.. ,तू ये ना धरला होता
हात तुझा मी रात्री ,अंधा-या..
हा देहच एक नवा तारा व्हावा , तू
ये ना मनाप्रमाणे माझ्या सगळे
तेव्हा, करायचा म्हणून आता
पुन्हा हट्ट धरावा, तू ये ना
कुणाकुणाचा हात टेकला आहे,
आभाळा चंद्र तरी माझ्या मिठीत
राहावा.. तू ये ना
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2505
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment